Google कडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा होणार बंद

प्रवाशांसाठी एक वाईट बातमी आहे. Google कडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा बंद करण्याचे संकेत गूगलकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात ही सेवा आता मिळणार नाही, हेच स्पष्ट झाले आहे. गूगलने अनेक देशांमध्ये फ्री वाय-फाय सेवा दिली होती. भारतातही ही सेवा रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करुन देण्यात आली होती. मुंबईत अनेक स्थानकांत ही सेवा सुरुही आहे. मात्र, गूगलच्या नव्या निर्णयामुळे ही सेवा आता बंद होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोफत वाय-फायचा लाभ मिळणार नाही.

from Zee24 Taas: Technology News https://zeenews.india.com/marathi/technology/google-to-wind-down-free-wifi-service-at-railway-stations-in-india-and-other-nations/509394

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या