जे अतिशय श्रीमंत लोक जगायला मुकतात
मी खाली काही गोष्टीची
यादी देतो. ह्या गोष्टी आपण मध्यमवर्गीय
लोक खूप आनंदाने जगतो जे अतिशय श्रीमंत लोक जगायला मुकतात.
![]() |
| स्वतःच्या मेहनतीने घेतलेली पहिली वस्तू |
1. आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पैशांनी मोटारसायकल किंवा घर घेतो त्यावेळेस होणारा आनंद. (स्वतःच्या मेहनतीने घेतलेली पहिली वस्तू..
श्रीमंत लोक मुकतात ह्याला.)
![]() |
| स्वतःच्या मेहनतीने घेतलेली पहिली वस्तू |
2. रस्त्याच्या कडेला पाणिपुरीवाल्या कडे उभे राहून, एका हातात कटोरी घेऊन दुसऱ्या हाताने त्यात मीठ टाकत ती मिटक्या मारत खाण्याचा आनंद. (स्वातंत्र्य.. तडजोड करून जगताना ही मजा येते जी त्यांना नाही कळणार.)
![]() |
| स्वप्न पाहून त्यासाठी अथक परिश्रम घेऊन ते नावारूपाला आणणे |
3. खूप अथक मेहनत केल्यानंतर आपला किंवा आपल्या पाल्याचा परीक्षेत अतिउत्तम निकाल हाती येतो. तेव्हा पालकांना आणि पाल्याला जग जिंकल्याची भावना येते. तो क्षण. (स्वप्न पाहून त्यासाठी अथक परिश्रम घेऊन ते नावारूपाला आणणे ह्याला श्रीमंत लोक मुकतात कारण त्यांच्याकडे सगळ बना-बनाया असत.)
![]() |
| साधेपणा आणि बिनधास्तपणा ते नाही जगू शकत |
4. नातेवाईकात लग्न असले किंवा मित्राचे लग्न असले एकत्र डीजे लावायचा किंवा ब्यांड पथक आणायचे आणि रात्र रात्र भर नाचायचे ते पण कशाचीही पर्वा न करता. (श्रीमंत लोकांच अतिनियोजन असल्यामुळे नाचायचा मजा उडून जातो. प्रतिष्ठा, रुबाब, श्रीमंती दाखवण्यात ते खूप काही मुकतात. साधेपणा आणि बिनधास्तपणा ते नाही जगू शकत.)
![]() |
| आपण मिळून मिसळून राहतो |
5. आपसातले सुखदुख वाटणारे, लगेच मदतीला धावणारे आणि नेहमी निस्वार्थपणे साथ देणारे आपले कुटुंब सदस्य आपल्याजवळ असतात. सोबत नसले तरी त्याचं-आपले अंतर फक्त एका कॉलवर मदतीला येतील एवढे असते. (आपण मिळून मिसळून राहतो.. नात्यातला तो गारवा, आपुलकी श्रीमंत लोकांकडे कमी आढळते. त्यांना सतत असुरक्षितता नात्यांमध्ये वाटते.)
![]() |
| श्रीमंत लोकांना मानसिक शांतात नसते |
6. गाढ, साखर झोप. मध्यमवर्गीय खूप कष्ट करतात, सगळी तडजोड ही करतात आणि त्यांच्याकडे खूप कमी साहित्य असते राहण्यासाठी. किंग साईज पलंग नसतो, ऐसी नसतो, मऊमऊ गादी नसते, वेलवेटची चादर ही नसते पण एक गोष्ट त्यांच्याकडे असते जी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे "मानसिक शांतात". आणि त्यामुळे ते कमी वस्तूमध्ये पण आनंदाने झोपतात. (श्रीमंत लोकांना मानसिक शांतात नसते. कितीही चांगल्या सुखसुविधा असू द्या, त्यांना सुखाची झोप क्वचित येते.)
![]() |
| दर्शन घेतांना आपण सगळे रांगेत उभे राहतो |
7. मंदिरात दर्शन घेतांना आपण सगळे रांगेत उभे राहतो. हातात पूजेच ताट, जास्वंदाचे फुल, दुधाची लहान पोटली आणि मनात देवाकडून हे मागू का ते मागू असा चालत असलेला गोंधळ. एका तासाने देवाचे दर्शन मिळते ते पण ओझरते आणि ते पण धक्काबुक्कीतच. पण मनात कुठेनाकुठे तो ऐकेल आपले अशी आशा असते. त्यावरचा अखंड विश्वास, ती श्रद्धा पाहून आपल्यालाच कधीकधी गहिवरून येते. (२००० रुपये देऊन मागच्या दारून सरळ गाभार्यात प्रवेश मिळवून देव प्रसन्न होत असावा अस मलातरी नाही वाटत.. जे श्रीमंत लोक सतत करतात.)
![]() |
| वस्तूंची गरज आणि किंमत माणूस जाणत नाही |
8. ५ रुपयाची कोथींबीर, १२ रुपयाचे बटाटे, ३ रुपयाचे आले आणि १० रुपयाचे टमाटे. एकूण झाले ३० रुपये, हे घ्या काका ५० ची नोट, आणि २० रुपये परत द्या. तो एक-एक रुपायचा हिशोब मनाला आल्हाद नक्कीच देतो. वस्तू जेवढ्या कमी, मुबलक आणि किमतीशीर असतात तेवढी त्यांची व्यक्तीला किंमत जास्त असते. सहज मिळणारे आणि सहज टिकणाऱ्या वस्तूंची गरज आणि किंमत माणूस जाणत नाही.
थोडक्यात:
स्वातंत्र्य, मानसिक शांतता, स्वतः मेहनतीने मिळवल्यावर झालेला आनंद, निस्वार्थ नाती, तडजोड आणि आरोग्य ह्या गोष्टी अतिश्रीमंत जण गमवतात.









0 टिप्पण्या