महाराष्ट्रातील १० सर्वांत श्रीमंत माणसे कोण आहेत ?
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत माणसे पहा आणि आपले डोळे उघडा आपण नक्की कुठे आपली शक्ती वाया घालवतोय .
महाराष्ट्रातील पहिल्या अकरा श्रीमंत लोकांमध्ये एकही मराठी माणूस असू नये ही नक्कीच अभिमानाची गोष्ट नाही .
या सर्व लोकांचे नक्कीच कौतुक आहे त्यांनी आपापल्या परीने मेहतीने आपले स्थान इथे निर्माण केले किंबहुना हा प्रदेश कधीएकाळी त्यांच्यासाठी होमग्राऊंड नव्हता तरीही कंफर्ट झोन सोडून त्यांनी जी काही उंची गाठली आहे त्याला नक्कीच सलाम .
१०) सुभाष चंद्रा आणि फॅमिली
सुभाष चंद्रा आणि त्यांच्या एकूण फॅमिली ची संपत्ती ६ बिलियन म्हणजेच जवळ जवळ ३८२९८ करोड इतकी आहे .
सुभाष चंद्रा हे एस्सेल ग्रुप चे सर्वेसर्वा आहेत .
हा ग्रुप पार्क्स ,पॅकेजिंग,इन्फ्रास्टक्चर आणि लॉटरी अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे .
झी एनएटरटाइनमेंट ग्रुप हा सुभाष चंद्र याचे चिरंजीव अमित चंद्रा आणि पुनीत चंद्रा हे दोघे मिळून चालवतात .
झी ग्रुप कडे विविध भाशांमधील ७५ पेक्षा अधिक चॅनल्स आहेत .
आणि जवळ जवळ १७१ विविध देशांमध्ये दहा करोड पेक्षाही जास्त त्यांचे प्रेक्षक आहेत .
९)नुसली वाडिया
नुसली वाडिया हे वाडिया ग्रुपचे चेअरमन आहेत .
अगदी कूकीज पासून हवाई क्षेत्र सगळीकडेच वाडिया साम्राज्य कार्यरत आहे .
वाडिया ग्रुपचे मूळ १७३६ पासून जहाज बांधणी क्षेत्रात सोनेरी अक्षरात नाव कोरलेले आहे .
वाडिया ग्रुप मध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रिज ,बॉम्बे डाईंग ,गो ऐअर अश्या अग्रगण्य कंपन्यांनचा समावेश होतो .
नुसली वाडिया यांची एकूण संपत्ती ६.५ बिलियन म्हणजेच ४१४८९ करोड इतकी आहे .
८) बजाज फॅमिली
बजाज फॅमिली कडे त्यांचा वडिलोपार्जित ९१ वर्षे जुना उद्योग समूह आहे .
बजाज ग्रुप हा त्यांच्या मोटोरसायकल निर्मिती साठी बाजाज ऑटो या नावाने जास्त ओळखला जातो .
सध्या बजाज ग्रुप हा बाजज फॅमिलीचे मोठे सुपुत्र राजीव बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे .
बजाज ग्रुप ची एकूण संपत्ती ८ बिलियन म्हणजेच ५१०६४ करोड इतकी आहे .
७)सायरस पुनावाला
सायरस पुनावाला ह्यांनी सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ची स्थापना १९६६ साली केली आणि त्यांनी अतिशय कष्टाने जगातील सर्वात मोठी लसी उत्पादन करणारी कंपनी म्हणून नावारूपाला आणली.
सिरम इन्टिट्यूट ऑफ इंडिया दरवर्षी फ्लू ,पोलिओ आणि इतर अशा १३ करोड लसी निर्माण करते .
सायरस पुनावाला यांची एकूण संपत्ती ९.३ बिलियन म्हणजेच ५९३६२ करोड इतकी आहे .
६) राधाकृष्णा दमाणी आणि फॅमिली
राधाकृष्ण दमाणी हे दलाल स्ट्रीट वरील एक प्रसिद्ध गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात .
राकेश झुनझुनवाला सकट सगळेच शेअर मार्केट चे बुल्स त्यांना आपले गुरु मानतात .
२००२ साली त्यांनी नव्या मुंबईमध्ये एक रिटेल स्टोअर चालू केली आणि त्याचीच चेन आज पण डी मार्ट म्हणून आज ओळखतो जो संपूर्ण देशात अमेरिकेतील वॉलमार्ट च्या धरतीवर पसरत आहे .
५)उदय कोटक
उदय कोटक यांची फॅमिली ट्रेडिंग चा उद्योग पूर्वापार करत होती परंतु उदय कोटक यांनी १९८५ साली फायनान्स कंपनी चालू केली.
याच फायनान्स कंपनीचे रूपांतर २००३ साली त्यांनी शेडूलड बँकेमध्ये केले .
कोटक महिंद्रा बँक आज भारतातील चौथ्या नंबर ची खाजगी क्षेत्रातील बँक आहे .
उदय कोटक यांची संपत्ती १०.९ बिलियन म्हणजेच ६९५७५ करोड इतकी आहे .
४) कुमार बिर्ला
कुमार बिर्ला हे कमोडिटी किंग म्हणून ओळखले जातात .
कुमार बिर्ला हे आदित्य बिर्ला ग्रुप चे चौथ्या पिढीतील चेअरमन आहेत .
आदित्य बिर्ला ग्रुप हाय ४.१ बिलियन डॉलर्स उत्पन्न असलेला एक मोठा उद्योग समूह आहे .
आयडिया सेल्युलर ही ह्याच ग्रुप ची एक कंपनी .
कुमार बिर्ला यांची एकूण संपत्ती १२.८ बिलियन म्हणजेच ८१७०३ करोड रुपये आहे .
३)दिलीप संघवी
दिलीप संघवी यांचे वडील हे फार्मासुटिकल डिस्ट्रिब्युटर होते .
दिलीप संघवी यांनी १५ हजार रुपये कर्ज आपल्या वडिलांकडून घेऊन १९८३ साली सन फार्मासुटिकल ही कंपनी सुरु केली .
आणि आज हीच सन फार्मासुटिकल ह्या क्षेत्रातील एक मोठं नागाव आहे .
दिलीप संघवी सध्या ह्या कंपनीचे मॅनेजींग डायरेक्टर म्हणून काम पाहतात .
दिलीप संघवी यांची एकूण संपत्ती १२.८ बिलियन म्हणजेच ८१७०३ करोड इतकी आहे .
२) गोदरेज फॅमिली
गोदरेज ग्रुप हा consumer गुड्स जायंट म्हणून ओळखला जातो .
हा ग्रुप १२० वर्षे जुनी उद्योग परंपरा असलेला ग्रुप आहे .
अर्देशीर गोदरेज यानी १८९७ मध्ये आपली वकिली व्यवसाय सोडून लॉक बनविण्यासाठी गोदरेज ग्रुप ची स्थापना केली आणि त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही .
गोदरेज ग्रुप हा ४. ६ बिलियन उत्पन्न असलेला एक मोठा उद्योग समूह आहे .
आदि गोदरेज हे गोदरेज समूहाचे चेअरमन आहेत
गोदरेज फॅमिलीची एकूण संपत्ती १४ बिलियन म्हणजेच ८९३६२ करोड इतकी आहे .
१) पालोनजी मेस्त्री
पालोनजी मेस्त्री हे १५२ वर्ष जुन्या शापोरजी पल्लोनजी ग्रुप ह्या बांधकाम क्षेत्रातील जायंट चे चैरमेन आहेत .
पालोनजी मेस्त्री यांची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांच्याकडे टाटा सन्स या कंपनीमध्ये १८.४% स्टेक आहेत .
पालोनजी मेस्त्री यांची एकूण संपत्ती १८. बिलियन म्हणजेच ११८३९३ करोड इतकी आहे .
***)मुकेश अंबानी(***🍊
मुकेश अंबानी हे धीरूभाई अंबानी यांनी स्थापन केलेल्या रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत .
मुकेश अंबानी देशातील सर्वात मोठी ऑइल अँड गॅस जायंट रिलायन्स इंडस्ट्रीज चे कर्ता धर्ता आहेत .
रिलायन्स उद्योग समूहाचे वार्षिक उत्पन्न ५१ बिलियन डॉलर्स इतके आहे .
मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ४१.८ बिलियन म्हणजेच २६६८११ करोड इतकी आहे .
धन्यवाद !
आमच्या माय प्रेरणा या संकेतस्थळाला जरूर भेट द्या इथे तुम्हाला विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यकिमत्वांच्या तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा अनुभव घेता येईल











0 टिप्पण्या