आता फेसबुक युजर्सलाही पैसे मिळवता येणार


फेसबुक युजर्सलाही पैसे मिळवता येणार

आता फेसबुक युजर्सलाही पैसे मिळवता येणार 


सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) एक मोठी घोषणा केली आहेत्या अंतर्गत आता युजर्सलाही पैसे मिळवता येणार आहेतयासाठी युजर्सला एक अॅप डाऊनलोड करावे लागणार आहेयाचा लाभ घेण्यासाठी युजर्सचे वय मात्र किमान 18 पेक्षा अधिक असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


आता फेसबुक युजर्सलाही पैसे मिळवता येणार :रिसर्च अँप 



फेसबुक संशोधनासाठी एक ‘रिसर्च अॅप’ (Research App) घेऊन आले आहेफेसबुकने मंगळवारी याची घोषणा केलीहे अॅप डाऊनलोड करताना युजर्सला त्यांच्या फोनमधील विविध अॅपचा ते किती वापर करता याची माहिती गोळा करण्याची परवानगी संबंधित रिसर्च अॅपला द्यावी लागणार आहेयानंतर हे अॅप युजर्सच्या फोनला ट्रॅक करुन कोण कोणते अॅप किती वेळ वापरतो याची माहिती संकलित करेलयाच्या बदल्यात फेसबुक युजर्सला पैसे देणार आहेयावेळी फेसबुकने हेही स्पष्ट केलेकी संबंधित अॅप केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले युजर्सच डाऊनलोड करु शकतात.


आता फेसबुक युजर्सलाही पैसे मिळवता येणार :स्टडी बाय फेसबुक


स्टडी बाय फेसबुक’ (Study by Facebook) नावाचे हे अॅप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सद्वारे वापरण्यात येणाऱ्या फीचरविविध अॅपवर खर्च केलेला वेळदेशडिव्हाईस आणि नेटवर्कच्या प्रकाराची माहिती संकलित करेलया बाजारकेंद्री संशोधनातून युजर्सच्या आवडीनिवडीची माहिती मिळेलत्याद्वारे फेसबुकला युजर्सला त्यांना आवडणाऱ्या गोष्टी उपलब्ध करुन देता येतीलअसा दावा फेसबुकने केला आहे.

अॅप माहिती संकलनाची परवानगी घेणार


मागील काही वर्षांपासून फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसीवर जगभरातून प्रश्न उपस्थित करण्यात आलेकेंब्रिज अनालिटिका प्रकरणानंतर तर फेसबुकला कठोर टीकेला सामोरे जावे लागले होतेफेसबुकने सांगितलेहे अॅप युजर्सला केवळ इंस्टॉल होण्याआधीचीच नाही तर इंस्टॉल केल्यानंतरही या प्रोग्राम अंतर्गत जाणाऱ्या डाटाची माहिती देईलया प्रोग्रामसाठी युजर्सची कमीत कमी माहिती घेतली जाईलतसेच अॅपमधील मजकुराचा कोणतीही माहिती गोळा केली जाणार नाही.


आता फेसबुक युजर्सलाही पैसे मिळवता येणारयूजर्सला किती पैसे मिळणार?


या प्रोग्राम अंतर्गत अॅप डाऊनलोड करणाऱ्या युजर्सला किती पैसे मिळणार याची कोणतीही अधिकृत माहिती फेसबुककडून देण्यात आलेली नाहीमात्रमागील वेळी अशाच प्रकारची योजना आणली तेव्हा फेसबुकने युजर्सला प्रति महिना 20 डॉलर दिले होते

आता फेसबुक युजर्सलाही पैसे मिळवता येणार :कोणत्या  देशांमध्ये ही योजना सुरु होणार?


फेसबुकचे हे अॅप सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिका आणि भारतात सुरु होणार आहेफेसबुक या अॅपचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही उपयोग करणार आहेजाहिरात पाहून  जे युजर्स या प्रोग्रामध्ये सहभागी होतील त्यांना अॅपवर साईनअप करावे लागेलयुजर्सची योग्यता तपासल्यानंतर फेसबुक अॅप डाऊनलोड करण्याची व्यवस्था करेल.

धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या