महाराष्ट्राची राजकीय संस्कृती


महाराष्ट्राची राजकीय संस्कृती

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती.


घरी सकाळपासून टिव्ही चालू आहे आणि जवळपास सर्वच मराठी हिंदी इंग्रजी चॅनलवरील चर्चा बघणे सुरू आहे. देशभरात जवळपास सर्वच चॅनलवरील पँनलिस्ट एकदम हमरीतुमरीवर येऊन चर्चा करत आहेत/होते.
पण मघाशी चॅनल बदलत असताना ABP माझा या मराठी चॅनलवर एक चर्चा सुरू असताना बातमी पहिली की स्पष्ट बहुमत मिळतंय असं दिसत असताना BJP चा एक पँनलिस्ट उठून इतर सर्व पँनलिस्ट लोकांना (त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, कम्युनिस्ट, मनसे वैगरे सर्व पक्षांचे प्रवक्ते होते
स्वतःहून पेढे भरवत होता आणि भले आज राजकीय विरोधक असले तरी ती लोकंही त्या BJP च्या पँनलिस्टचं पेढा भरवून अभिनंदन करत होते.

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती

मी बऱ्याचदा हे बघितलं आहे तसेच अनुभवलं ही की एक महाराष्ट्र सोडला तर देशाच्या इतर भागात असे वातावरण कधीच दिसत नाही किंवा नसते.
एवढ्या खेळीमेळीत कधीच ती लोकं एकत्र येत नाहीत/बसत नाहीत. राजकीय पक्षाचे नेते/कार्यकर्ते इतके कट्टर असतात की दोघांतील एक खपेपर्यंत ही दुष्मनी सुरू असते.
मागे एकदा एका कामा संदर्भात महाराष्ट्र बाहेरच्या खासदारासोबत भेट झाली होती तेव्हा कॉफी पिताना त्यांनी देखील हाच उल्लेख केला होता की, "आपका कल्चर अलग हें, आपका बॅकग्राऊंड अलग हें. आप अलग अलग विचारधारावाले लोग एकसाथ बेठकर at list बात कर सकते हें.
हम लोगोको एकसाथ बेठना तो छोडो अगर गलती सें आमने सामने आये तो भी नजर मिलाने के लिये सोचना पडता हें".
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती

सुदैवाने किमान महाराष्ट्रात तरी असं वातावरण नाहीये. फेसबुकवरच्या अनेक ग्रुपवरच्या चर्चा वाचतोय तर दोन वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आमचे तर गेले आता संध्याकाळी तुमच्या सेलिब्रेशनला "बसू" वैगरे टाईपच्या चर्चा करत आहेत 🤣😂
असो, महाराष्ट्राची हीच संस्कृती आहे आणि इतरांपेक्षा हेच वेगळेपण आहे. बाकी निव्वळ द्वेषापायी रात्रंदिवस गरळ ओकणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा किंवा केलेले केव्हा ही उत्तम, ही येडी काय सुधारणाऱ्यातली नाहीत.

लेखक :नचिकेत गुरव (बदलापूर )

धन्यवाद !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या