गुंतवणुकीचे आयोजन भाग २


गुंतवणुकीच्या आयोजनातीक मुख्य धोरणे


गुंतवणुकीचे आयोजन करताना महत्वाचे मुद्दे (इन्व्हेस्टमेंट कॉन्सिडेंशन्स )



आपण बचत केलेल्या पैश्याची,योग्य गुंतवणूक करून जास्त कमाई करू इच्छितो. परंतु ती गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी केली नाही तर काही उपयोग होत  नाही

  • बचत हे आयोजनाचे मुख्य ध्येय आहे
  • गुंतवणूक केल्यानंतर त्यावर आपले नेहमी लक्ष असले पाहिजे
  • बचत योजनेची संपूर्ण माहिती असली पाहिजे
  • तुम्ही केलेल्या बचत मधूनच गुंतवणूक करा म्हणजेच कर्ज काढुन गुणतवणूक करू नका
  • तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक करा
  • नुकसान सहन करण्याची क्षमता तुमच्या कडे सारायला हवी

व्यक्तीने सर्व प्रथम स्वतः:च्या गुंतवणुकीच्या उद्देशावर व्यवस्थित लक्ष ठेवले पाहिजे . आपली बचत रक्कम वाढायला हवी मात्र त्यातला धोका कमी असायला हवा
आयोजनाच्या पूर्वी तुम्हाला खालील मुद्द्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे
तुमच्या कठीण प्रसंगात तुमच्या बचत आयोजनावरती कोणत्याही प्रकारचा दबाव येणे महत्वाचे आहे

बचत करण्यापूर्वी तुम्ही खाली दिलेल्या मुद्द्याचा अभ्यास करणे जरुरी आहे


  • भविष्यात अचानक येणाऱ्या कठीण प्रसंगासाठी आगोदरच वेगळी बचत करावी
  • त्यासाठी जीवनविमा आरोग्य विमा आणि अपघात विमा करून घ्यावा
  • खर्चावरती नियाबटरं आले पाहिजे
  • निरवूत्तीच्या वेळी उत्पन्नाची योजना पाहिजे

गुंतवणुकीच्या आयोजनातीक मुख्य धोरणे (इन्व्हेस्टमेंट सिलेक्शन क्रायटेरिया




गुंतवणूक करताना खालील गोष्टींचे आयोजन  महत्वाचे आहे

  • धोका (रिस्क ). 
  • फायदा (रिटर्न ). 
  • रोख रक्कम (लिक्विडीटी ) मिळण्याची आणि बाजारात लगेच विकण्याची क्षमता
  • खर्च (कॉस्ट). 
  • वेगवेगळ्या सिक्युरिटेजमध्ये गुंतवणूक करणे (डिव्हर्सिफिकेशन). 
  • सिक्युरिटीज वरील कर (टॅक्सेस). 


गुंतवणूक करण्या आधी घ्यायची काळजी (केअर टू बी टेकन व्हाईल इन्व्हेस्टिंग ). 



गुंतवणूक करण्यापूर्वी खालील मुद्द्यांची तपासणी करणे आवश्यक आहे


  • गुंतवणुकीची माहिती देणारे महत्वाचे कागदपत्र पाहणे
  • दस्तावेजातील कागदपत्रांची माहिती करून घेणे
  • गुंतवणूक करताना येणारा खर्च त्यात नफा किती होईल हे पाहणे
  • गुंतवणुकीची योजना तुमच्या गरजेप्रमाणे आहे की नाही ते पाहणे
  • दलालाकडुन पूर्ण माहिती मिळविणे
  • तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक कराल टी सिरक्षित असली पाहिजे
  • एखाद्या योजनेत काही अडचण आली तर बाहेर पडण्याचा मार्ग माहिती असला पाहिजे अन्यथा त्यात गुंतवणूक करू नये



धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या