![]() |
| अमेरिकेत घराच्या बांधकामात लाकडाचा वापर अधिक का असतो? |
अमेरिकेत घराच्या बांधकामात लाकडाचा वापर अधिक का असतो?
भारतीय घरांच्या तुलनेत अमेरिकेत घराच्या बांधकामात लाकडाचा वापर अधिक का असतो? याची काही मुख्य कारणं खालील प्रमाणे:-
1. अमेरिकेतील प्रतीमाणशी जंगल क्षेत्र हे भारतातील जंगल क्षेत्रापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे तिथे भरपूर लाकूड उपलब्ध आहे आणि ते स्वस्त ही आहे.
2. अमेरिकेत मुख्यतः पाईन, रेडवूड अशी उंच व सरळ झाडे उपलब्ध आहेत. त्यांची कटाई करणं हे तुलनेने अधिक सोप्प आणि कमी खर्चाचे काम आहे. याउलट भारतात वड, पिंपळ, सागवान अशी झाडे आहेत ज्यांचा कटाई चा खर्च जास्त आहे.
3. संस्कृतीचा विचार केल्यास जेव्हा यूरोपियन लोकांनी अमेरिकेत वास्तव्याला सुरवात केली तेव्हा तिथे बरेच व्यापक जंगल होते. त्यामुळे पहिली घरे बांधली गेली तीसुद्धा लाकूड वापरूनच. नंतर तीच पद्धत चालू राहिली. याउलट भारतातील पुरातन हडप्पा संस्कृती पासूनच इथे वीट आणि मातीपासून बनवलेली घरे बांधली जातात.
4. वातावरणाचा विचार केल्यास अमेरिकेतील थंड वातावरणामुळे तिथे लाकूड हा पर्याय स्वस्त व टिकाऊ वाटतो. याउलट भारतातील उष्ण आणि आर्द्र वातावरणामुळे इथे लाकडाची घरे कमी कालावधी मध्ये कमकुवत होतील. त्यामुळे भारतात वीट, माती आणि सिमेंट ची घरेच उपयोगी आहेत.


0 टिप्पण्या