WhatsApp आपल्या लोकप्रिय स्टिकरच्या फीचरवर काम करतेय


myprerana.com



WhatsApp आपल्या लोकप्रिय स्टिकरच्या फीचरवर काम करतेय. WABetaInfo च्या ट्विटनुसार व्हाॅट्सअॅपनं बिटा व्हर्जन 2.19.130 अपडेट सबमिट केलंय. लवकरच ‘Sticker Notification Preview’  नावानं फीचर लाॅन्च होणार आहे.
हे फीचर आल्यानंतर तुम्ही मेसेज उघडताच स्टिकर कुठला आहे ते कळू शकेल.


कसं काम करेल हे फीचर?
‘Sticker Notification Preview’  या फीचरमुळे तुमच्या नोटिफिकेशनची पद्धत बदलेल. जेव्हा आपल्याला ‘Sticker’ असा मेसेज येतो तेव्हा आपल्या नोटिफिकेशनच्या पॅनेलमध्ये Sticker असं दिसतं. पण आता हे फीचर सुरू झालं तर नोटिफिकेशनमध्येच कोणता स्टिकर आहे, ते कळू शकतं.

WABetaInfo नं केलेल्या एका ट्विटनुसार व्हाॅट्सअॅपमध्ये Animated Stickers लाँच केलं जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या