स्मार्टफोन तयार करणाऱ्या Itel या कंपनीने Itel A46
हा नवा स्मार्टफोन भारतीया बाजारपेठेत लाँच केला आहे. या फोनमध्ये ड्युएल रियर कॅमेरा सेटअप, रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि आउट ऑफ बॉक्स अँड्रॉइड पाई आहे. कंपनीने या फोनची किंमत 4,999 रुपये अशी ठेवली आहे. या फोनमध्ये तुम्हाला iPhone सारखे फीचर्स मिळतील. Itel A46 या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर, तर सेल्फीसाठी सॉफ्ट फ्लॅश देण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत हा फोन Redmi 6A
या स्मार्टफोनला टक्कर देणार, असा दावा आयटेल मोबाइलने केला आहे.
कॅमेरा - Itel A46 मध्ये ड्युएल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलचा प्राइमरी तर सेकंडरी कॅमेरा VGA AI असणार आहे. कंपनीने या फोनमध्ये सेल्फीसाठी एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
iPhone सारखे फीचर्स - Itel च्या या स्मार्टफोन मध्ये iPhone सारखंच फेस अनलॉक फीचर देण्यात आलं आहे. तर बॅक पॅनलमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा देण्यात आलं आहे. बॅटरी 2,400 एमएएच ची असून, हा फोन खरेदी करताना तुम्हाला स्क्रीन गार्ड आणि सिलिकॉन केससह तुम्हाला मिळेल.
ही आहेत फीचर्स -
-
आयटेल A46 या स्मार्टफोनला 5.45 इंचाचा फुलस्क्रीन एचडीआईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे.
-
अँड्रॉइड 9 पायवर चालणाऱ्या या फोनमध्ये 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर बसवण्यात आलं आहे.
-
2GBRAM16GB इंटरनल स्टोअरेज यात असून, मायक्रोएसडी कार्डाच्या सहाय्याने ते 128GB पर्यंत तुम्हाला वाढवता येईल.
-
या फोनचं आणखी एक व्हेरिएंट आहे ज्यात 1GBRAM16GB इंटरनल स्टोअरेज देण्यात आलं आहे.
-
पावरसाठी या फोनमध्ये 2400mAh ची बॅटरी बसवण्यता आली आहे.
-
ड्युएल टोन कलरच्या चा हा फोन ग्रेडियंट डायमंड ग्रे, नियॉन वॉटर, डार्क वॉटर आणि लाल या रंगात तुम्हाला खरेदी करता येईल.

0 टिप्पण्या