गुगलच्या पाच मोठ्या घोषणा; हे आहेत फायदे





गुगलने आपल्या वार्षिक परिषदेत मोठ्या घोषणा केली आहे. गुगलने आपली नवी ऑपरेटिंग सिस्टीम अॅण्ड्राइड क्यूपासून सर्च रिझल्ट, गुगल लेंस, ड्रायव्हिंग मोड, ऑटो डिलीट कंट्रोल, गुगल असिस्टंट्स आदींबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. या घोषणा युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे.
गुगल सर्चमध्ये व्हिजन
गुगल सर्चमध्ये कॉम्प्युटर व्हिजन आणि ऑग्मेंटेड रिअलिटी आणण्यात येणार आहे. युजर्सना आता सर्च रिझल्टमध्ये ३डी इमेज किंवा ३डी मॉडेल दिसणार आहेत. तुम्ही ३डी मॉडलवर टॅप केल्यानंतर ऑग्मेंटेड रिअलिटीने तुम्ही रिअल वर्ल्ड व्ह्यूचा वापर करू शकाल. त्यामुळे सर्च करत असलेली गोष्ट प्रत्यक्षात कशी दिसू शकते हे समजणार आहे. गुगल न्यूजमध्ये 'फूल कव्हरेज' फीचर उपलब्ध होणार आहे. या फीचरला यावर्षाखेरपासून अंमलात आणण्यात येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या