रेडमी ऑल इन वन रिमोट

रेडमी ऑल इन वन  रिमोट 


आपण लहानपणी ऑल इन वन की बद्दल आपल्या सिनेमांद्वारे खूप काही ऐकलेले असते . या सिनेमातील की आपल्याकडे देखील असावी अस आपल्याला मनोमन वाटत असते परंतु तस कधीच घडत नाही .
परंतु माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात अशक्य असं काहीच राहिलेच नाही असच कधी कधी वाटत .
आता पहाना आपल्याकडे रेडमी किंवा शाओमी चा जर फोन असेल तर त्यामध्ये रेडमी च्या सॉफ्टवेअर डेव्हलपर्स ने एक भन्नाट अँलिकेशन दिलेले आहे .
या अप्लिकेशन चे नाव आहे मी रिमोट  .
तुम्ही या अँप द्वारे जगातील कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण कंट्रोल करू शकता .
आणि तुमच्या मित्रांना तुमच्या टेक knowledge ने इंप्रेस करू शकता .
तुमचे मित्र तुमची ही किमया पाहून थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

तर आता आपण पाहू हे अँप नक्की काम कसे करते .

तुमच्या रेड मी फोन मध्ये मी रिमोट हे आप प्रिइंस्टॉलड असते ते तुम्हाला प्ले स्टोअर मधून वेगळे डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही .

तर अशाप्रकारे दिसते हे अँप किंबहुना असा लोगो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेनू स्क्रीनवर दिसेल त्यावर क्लिक करा .



त्यांनतर सर्वांत वरती मी रिमोट ह्या नावाच्या बाजूला तुम्हाला + हे अधिक चे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा .
त्यांनतर तुम्हाला काही इलेक्ट्रॉनिक उपकरणाची लिस्ट मिळेल उदा. टीव्ही ,सेट टॉप बॉक्स ,AC ,फॅन,प्रोजेक्टर इ.

आता तुम्हाला जे उपकरण कंट्रोल करायचे आहे त्यावर क्लिक करा .
आता मी रिमोट अँप मध्ये जवळ जवळ सगळ्याच ब्रँडेड उपकरणाची यादी आहे त्यातील तुम्हाला जे उपकरण कंट्रोल करायचे आहे ते सिलेक्ट करा .

आता तुमचे उपकरण चालू आहे ना हे एकदा मॅनुअली कन्फर्म करा.

त्यानंतर मी रिमोट च्या ब्लु कलरच्या पॉवर बटन दाबून धरा .
काही सेकंदात तुमच्या उपकरणाचा मॉडेल नंबर लिस्ट तुमच्या समोर येईल त्यातील तुमचे मॉडेल सिलेक्त करा .
आणि तुम्हाला तुमच्या उपकरणाचा डिजिटल रिमोट मी रिमोट अँप वर उपलब्द होईल .
आता तुम्ही ते सर्व करू शकता जे तुमचे फिसिकल रिमोट करत होता .
आणि अचानक टीव्हीहीचा चॅनल बदलून तुमच्या आजुंबाजूच्या मित्राना चकित करा .

धन्यवाद !



आमच्या  माय प्रेरणा या संकेतस्थळाला जरूर भेट द्या इथे तुम्हाला विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यकिमत्वांच्या तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा अनुभव घेता येईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या