फेसबुक चा पासवर्ड कसा चेंज कराल.

फेसबुक चा पासवर्ड कसा चेंज कराल. 



जुना पासवर्ड  बदलण्यासाठीची प्रक्रिया 

पहिले आपला फेसबुक अकाउंट लॉगइन करा .

नंतर जर तुम्ही वेबसाइट वर लॉगईन असाल तर तुमच्या होमपेजवर एक क्वेशन मार्क(प्रश्नार्थक चिन्ह ) च चिन्ह असेल त्याच्या बाजूलाच एक डाउन  ऍरो असेल त्यावर क्लिक करा .

नंतर सेटिंग्स वर क्लिक करा .

त्यानंतर तुम्हाला सेक्युरिटी आणि लॉगिन चा ऑपशन मिळेल त्यावर क्लिक करा .

इथे तुम्हाला लॉगइन या टॅब खाली चेंज पासवर्ड चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.

आता फेसबुक तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड विचारेल तो एंटर करा आणि तुमचा नवीन पासवर्ड दोन वेळा एंटर करा .

आणि सेव्ह चेंजेस वर क्लिक करा तुमचा नवीन पासवर्ड सेट होऊन जाईल .

जुना पासवर्ड विसरले असाल तर काय कराल 


परंतु जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल किंवा तुम्हाला फेसबुक ला लॉगइन करता येत नसेल तर ,
फेसबुक च्या वेबसाईट ला विझिट करा .

त्यातही लॉगिन ऑपशन च्या खाली तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड चा ऑपशन मिळेल त्यावर क्लिक करा .

फेसबुक शी संलग्न तुमची इमेल आयडी तेथे एंटर करा आणि सबमिट बटण वर क्लिक करा .

आता तुमच्या इमेल बॉक्स ओपन करा तेथे तुम्हाला पासवर्ड रिसेट ची लिंक असलेला इमेल तुम्हाला प्राप्त होईल . त्यातील लिंक वर क्लिक करा .

आता फेसबुक तुमची ओळख नक्की करण्यासाठी तुंम्हाला काही तुमच्या फेसबुक प्रोफाइल संबंधी प्रश्न विचारेल त्यांची योग्य उत्तरे द्या .

हे प्रश्न साधारणतः: तुमच्या फेसबुक वरील ऍक्टिव्हिटीस आणि मित्र यादी यासंदर्भातच असतात .
ही उत्तरे बरोबर दिल्यानंतर तुम्हाला नवा पासवर्ड सेट करता येत्तो .


पासवर्ड सेट करते वेळी खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा . 

१. पासवर्ड कमीत कमी आठ अंकी असावा .

२.पासवर्ड मध्ये केवळ तुमचे नाव ,अथवा मोबाइल नंबर ठेवणे  टाळा कारण ते सहजरित्या हॅक होऊ शकतात .

३. पासवर्ड मध्ये अक्षर अंक आणि स्पेशल कॅरॅक्टर(@,*,%,^ ) याचा मिलाप असेल तर उत्तमच .

४. पासवर्ड कोणत्याही ठिकाणी लिहून ठेऊ नका .

५. पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका .

६. पासवर्ड तुम्हाला सहजगत्या लक्षात राहिलं आणि लिहून ठेवावा लागणार नाही असाच ठेवा .

७. पासवर्ड वेळोवेळी किमान तीन महिनातून एकदा बदलत रहा .

धन्यवाद !!

आमच्या  माय प्रेरणा या संकेतस्थळाला जरूर भेट द्या इथे तुम्हाला विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यकिमत्वांच्या तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा अनुभव घेता येईल



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या