संगणक काय आहे व का समजून घेणे गरजेचे आहे


संगणक काय आहे ?

संगणक एक असे यंत्र आहे ज्याद्वारे आपण आपले नेहमीचे व्यवहार अधिक वेगाने आणि अचूकरीत्या करु शकतो .
संगणकाच्या मदतीने आपण अधिक माहिती संग्रहित करून ठेऊ शकतो .
संगणकाचा वापर हा नव्या पिढीसाठी अपरिहार्य आहे . प्रत्येक क्षेत्रात आज संगणकाचा वापर वाढलेला आहे .
किंबहुना संगणकामुळे आणि त्यातील प्रगतीमुळे प्रत्येक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी होत आहेत .
आजच्या नव्या पिढीला संगणकातील नवनवे  गॅजेट्स उ.दा मोबाईल लॅपटॉप पॅड आणि कित्येक इतर हल्ली स्मार्ट वॉच आणि स्मार्ट टीव्हीही बाजारात उपलब्ध आहेत .
ह्या सगळ्या गोष्टी संगणकातील संशोधन आणि प्रगतीचाच एक भाग आहेत.

आज तुम्ही कोणतेही शिक्षण घेत असाल पण तुम्हाला त्याला डिजिटल स्वरूप देता आले नाही तर तुम्ही बर्याच प्रमाणात मागे पडण्याची दाट शक्यता आहे .
हे डिजिटायझेशन म्हणजे नाक्की काय ?
तर तुम्ही जे कोणते काम करता त्याला तुम्ही संगणकाच्या मदतीने अधिक सोप्या पद्धतीने करू शकता किंवा तुमचे काम कमी श्रमात आणि कमी कालावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकता .

काही वर्षणापुर्वी काही लोक असे म्हणायचे की संगणक काय आवाश्यक गोष्ट नाहीये परंतु आज हाच संगणक प्रत्येक क्षेत्रात अपरिहार्य घटक बनलेला आहे .
अगदी तुमच्या खिशातील मोबाईल पासून ते तुमच्या बँक खात्यापर्यंत प्रत्येक गोष्ट कुठेना कुठे संगणकाशी निगाडीत आहे .
संगणक आज भारतातील बर्याचश्या प्रमाणात पहिल्या पिढीला अवगत आहे त्यामुळे साहजिकच संगणकाचे आपण ग्राहक आहोत परंतु आपली दुसरी पिढी ही संगणकाची केवळ ग्राहक न बनता तिने ह्या संगणकाच्या प्रगतीमध्ये आणि संशोधनामध्ये मोलाचा वाटा उचललेला आपल्याला पाहायचा असल्यास आपण संगणक आणि त्याचे विविध गॅजेट्स कडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलण्याची अत्यंत आवश्यकता आहे .

हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपण ह्या ब्लॉग च्या माध्यमातून आपल्याच भाषेत आपल्या सर्व बांधवाना अशेच काही टेकनिकाल ज्ञान शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत ..
तरी आपल्याला जर येथील कोणतीही माहिती आवडली तर जरुर आपल्या मित्रांसोबत शेअर करा .....

धनयवाद !!

आमच्या  माय प्रेरणा या संकेतस्थळाला जरूर भेट द्या इथे तुम्हाला विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यकिमत्वांच्या तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा अनुभव घेता येईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या