गुंतवणुकीच्या योजनेचे वेगवेगळे प्रकार (टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट्स)
- भौतिक गुंतवणूक (फिजिकल असेट इन्व्हेस्टमेंट )
:
ही गुंतवणूक पुढील प्रकारे केली जाते. उदाहरणार्थ सोने,जमीन खरेदी करणे.
- आर्थिक गुंतवणूक (फायनांशियल असेट इन्व्हेस्टमेंट ):
ही गुंतवणूक पुढील प्रकारे केली जाते. उदाहरणार्थ बँकेची बचत योजना,पोस्टाची बचत योजना,पी पी एफ योजना,शेअर बाजार वगैरे मध्ये गुंतवणूक करणे.
खाली दिलेले आयोजन योजना
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड.
- नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट.
- बँक फिक्स्ड डिपॉंझिट.
- बँक रिकरिंग डिपॉझिट.
- इन्फ्रास्ट्रक्टर बॉंड
.
- कंपनी फिक्स्ड डिपॉझिट
.
- आरबीआय रिलीफ बॉंड
.
- पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट
.
- पोस्ट ऑफिस मंथली स्कीम
.
- पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट.
- नॅशनल सेविंग स्कीम
.
- किसान विकास पत्र
.
- म्युच्युअल फंड युनिट्स
.
- शेअर (सामान भाग
).
- डिबेंचर
.
- रियल इस्टेट (स्थावर मालमत्ता
).
- कमोडिटी
.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पी पी एफ ) टॅक्सची बचत करण्यासाठी सर्वात लोकप्रिय योजना आहे .
पी पी एफ चे खाते कोणत्याही सार्वजनिक बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये आपण खोलू शकता .
हे खाते आपण ५०० रुपये भरून आपल्या किंवाआपल्या लहान मुलाच्या नावे देखील खोलु शकतो .
त्याचे वार्षिक चक्रवाढ व्याज ८% आहे आणि ते आरबीआय च्या सुचणेनुसार बदलत राहते.
पी पी एफ अकाउंट चा फायदा :
- तीन वर्षनंतर आपण लोन घेऊ शकतो
.
- तुमचे सर्व पैसे सुरक्षित राहतात
.
- पालक त्यांच्या अज्ञान मुलांच्या नावे पी पी एफ खाते खोलू शकतात
आणि करात सवलत मिळवू शकतात.
- पीपीएफ ची रक्कम पूर्णपणे करमुक्त असते
.
- पी पी एफ मध्ये ठेवलेल्या रक्कमेवर कोर्ट जप्ती आणू शकत नाही. तसेच कर्ज देणाराही यावर जप्ती आणू शकत नाही
.
- पी पी एफ मध्ये वर्षाला आपण जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकतो.
पी पी एफ अकाऊंट चा तोटा :
- योजनेची मुदत १५ वर्षे असते . ही योजना वयस्कर लोकांसाठी योग्य नाही.
- चार वर्षापर्यंत जमा केलेल्या रक्कमेचे फक्त ५०% आपण ७ वर्षाने काढू शकतो
.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एन एस सी ) सुरक्षित आणि करात सवलती मिळवून देणारी योजना आहे .
त्याचे चक्रवाढ व्याज ८ % आहे. व्याजाची गणती सहा महिन्याने होते . या योजनेला सरकारचा पाठींबा आहे म्हणून टी संपूर्ण सुरक्षित आहे. यांचे फिजिकल सर्टिफिकेट पोस्ट ऑफिसमधून देण्यात येतात.याचा कालावधी सहा वर्षांचा असतो.
फायदा :
या योजनेअंतर्गत आपण बँकेतून कर्ज काढू शकतो.
बँक फिक्स्ड डिपॉझिट
तुम्हे जेव्हा बँकेमध्ये स्थिर मुदतीसाठी आणि तसेच स्थिर व्याजाने रक्कम ठेवता याला फिक्स्ड डिपॉझिट असे म्हणतात.
स्थिर मुदतीसाठी तुम्हाला व्याजासहित मुद्दल रक्कम मिळते. आज या योजनेत बँकेमध्ये ६ ते ७ टक्के व्याज मिळते .
व्याजाचा दर हा डिपॉझिट करताना ठरावाला जातो तो ठरविलेल्या कालावधीपर्यंत कायम राहतो .
एका हजारापासून ते तुम्हाला हव्या त्या मुददल्लीपर्यंत आपण फिक्स्ड डिपॉझिट खाते खोलू शकता .
प्रत्येक बँकेतील व्याजाचा दार हा असतो .
फायदा
- ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे.यामुळे ७५% ते ९०% बँकेकडून कर्ज मिळते . आणि हे कर्ज आपल्या फिक्स्ड डिपॉझिट खात्यापेक्षा १ ते २ टक्के जास्त दराने दिले जाते.
- सार्वजनिक बँकेतील योजना ह्या अधिक जास्त सुरक्षित असतात
.
तोटा
- या गुंताबवणुकीत व्याजाचा दार हा इतर गुंतवणुकीपेक्षा कमी आहे
.
रिकरिंग बँक डिपॉझिट (आर डी )
या योजनेमध्ये तुम्ही स्थिर मुदतीसाठी दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करू शकता आणि एफ डी प्रमाणेच बँक ठरवलेला व्याज दर निर्धारित मुदतीसाठी देण्यास बंधनकारक आहे .
या योजनेतही तुम्हाला तुमच्या मुद्दल रक्कमेबरोबर व्याजाचा परतावा मिळतो .
ही योजना नोकरदार वर्गासाठे आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी बचतीचा उत्तम पर्याय आहे .
फायदा
- या योजनेमध्येयें थोडी थोडी रक्कम दर महिना अगदी १०० रुपायांपासून आपण सुरु करू शकतो. आणि बचत मुदतीअंती एकाच वेळी मोठी रक्कम एकदाच हाती मिळते.
- ही योजना नोकरी करणाऱ्या आणि लघु उद्योग करणाऱयांसाठी खूप फायदेशीर आहे.
तोटा
- ह्या योजनेमध्ये व्याजाचा दार हा कमी असतो.
इन्फ्रास्ट्रक्चर बॉंड
हे बॉंड आयसीआयसीआय बँक आणि आयडीबीआय बँक जाहीर करते . त्यांचे नाव आयसीआयसीआय सेफ्टी बॉंड आणि आयडीबीआय फ्लॅक्सी बॉंड असे आहे .
आयसीआयसीआय चा दीप सेफ्टी डिस्काउंट बॉंड हा उत्पन्नावरील करामध्ये सवलत मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
ही बॉंड फिजिकल किंवा डिमॅट मार्फत मिळू शकतात.
फायदा
- हे बॉंड आपण बँकेत ठेऊन कर्ज घेऊ शकतो.या कर्जाची रक्कम त्याच्या वर्तमान किंमतीवर अवलंबून आहे
.
कंपनी फिक्स्ड डिपॉझिट
फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनीमध्ये तुम्ही व्याजावरती ठराविक कालावधीसाठी पैसे ठेऊ शकता .
ही योजना कंपनीच्या ऍक्ट ५८ मध्ये येते.
या योजनेत धोक्याचे प्रमाण जास्त आहे . परंतु या योजनेमध्ये व्याजाचा दार हा बँकेपेक्षा फार जास्त असतो .
या गुंतवणुकीमध्ये कंपनी कधी अडचणीत आली तर व्याज मिळणे कठीण होते आणि केव्हा केव्हा मूळ मुद्दल मिळण्याची शक्याता ही कमी असते .
फायदे
- या गुंतवणूक योजनेमध्ये व्याजाचा दार बँक पी पी एफ आणि पोस्ट ऑफिस पेक्षा जास्त असतो
.
तोटा
- कंपनी डिपॉझिट ही सुरक्षित गुंतवणूक आहे . यामध्ये पैशाची गुंतवणूक करण्यासाठी क्रेडिट रेटिंग जाणून घेणे महत्वाचे आहे .आणि व्याजाचा दर जास्त असेल तर धोका जास्त असू शकतो
.
- कंपनी काही कारणात्सव अडचणींमध्ये आले तर व्याज आणि मूळ मुद्दल सुद्धा धोक्यात येऊ शकतो .

0 टिप्पण्या