काय आहे पोलो खेळाचा इतिहास !
काठी आणि चेंडू या साधनांनी घोड्यावरून खेळावयाचा खेळ. हा अत्यंत प्राचीन खेळ असून, तो इराणमध्ये पहिल्या शतकात खेळला जात असावा, असे उपलब्ध पुराव्यावरून दिसते. तत्पूर्वीही इ. स. पू. ६०० मध्ये इराणी व तुर्कमेन लोकांमध्ये झालेल्या एका सामन्याचे वर्णन कवी फिरदौसीने केले आहे. अल्-जहिजने सु. ८६० मध्ये लिहिलेल्या एका वृत्तांतामध्ये ८०० वर्षांपूर्वीच्या या खेळाचे वर्णन केले आहे. मात्र सुरुवातीला त्याचे स्वरूप आजच्या अर्थाने खेळाचे नव्हते; तर लोकजीवनातील एक धार्मिक सुफलता विधी, असे होते. त्यात हजारोंच्या संख्येने लोक भाग घेत. सुरुवातीला त्यास घोडेस्वारांच्या पलटणींना प्रशिक्षण देणारी क्रीडा, असेही स्वरूप होते. कालांतराने पोलो हा इराणचा राष्ट्रीय खेळ बनला व तो राजघराण्यात व सरदारवर्गातही खेळला जाऊ लागला. राजपुत्रांना त्याचे खास प्रशिक्षण दिले जाई. स्त्रियाही त्यात भाग घेत असल्याचे उल्लेख आढळतात (सहावे शतक). इराणमधील पोलो खेळाची लघुचित्रेही पाहावयास मिळतात. ‘चौगान’ या नावाने हा खेळ इराणमध्ये खेळला जात असे.
इराणमधून हा खेळ कालांतराने अरबस्तान, तिबेट, चीन, जपान या देशांत पसरला. चीनमध्ये त्यास अमाप लोकप्रियता लाभली. पोलो ही संज्ञा ‘पुलू’ (चेंडू) या तिबेटी शब्दापासून निर्माण झाली असावी.
काय आहे पोलो खेळाचा इतिहास !: भारतीय पोलो
भारतात पोलो मोगल जेत्यांकरवी
तेराव्या
शतकात येऊन पोहोचला. त्याचे लिखित स्वरूपातील
नियम प्रथम अकबर बादशहाच्या
कारकीर्दीत
(सोळावे शतक) तयार झाले. एकोणिसाव्या
शतकात पाश्चात्त्यांनी
हा खेळ भारतातच आत्मसात केला. मात्र तत्पूर्वी
या खेळाचे वर्णन सर अँथोनी शर्ली यांच्या ट्रॅव्हल्स
टू पर्शिया (१६१३) या पुस्तकात
केलेले आढळते. आसाममधील
चहामळ्याच्या
ब्रिटिश मालकवर्गात
हा खेळ सुरुवातीस
खेळला जात होता. त्यांनी १८५९ मध्ये सिल्चर येथे पहिला ब्रिटिश पोलो क्लब स्थापन केला. १८६० यादशकाच्या
प्रारंभी
‘कलकत्ता पोलो क्लब’ची स्थापना झाली. त्यानंतर
अल्पावधीतच
हा खेळ फार लोकप्रिय
झाला. १८६९ मध्ये पोलो इंग्लंडला
परिचित झाला व ‘हॅर्लिंगहॅम क्लब’ या प्रमुख संघटनेची लंडन येथे स्थापना झाली. १८७६ मध्ये जेम्स गॉर्डन बेनेट या पत्रकाराने हा खेळ अमेरिकेत नेला. त्या ठिकाणी १८८१ मध्ये प्रख्यात ‘मेडो ब्रुक क्लब’ची स्थापना झाली. खेळाडूंची संख्या सुरुवातीस आठ होती, ती पुढे पाचावर आली आणि तदनंतर अमेरिकेत १८८१ मध्ये व इंग्लंडमध्ये १८८३ मध्ये सध्याप्रमाणे चार खेळाडूंवर येऊन स्थिरावली. १८९० मध्ये ‘युनायटेड स्टेट्स पोलो असोसिएशन’ ही संघटना निर्माण झाली. तिने अमेरिकेतील खेळाच्या नियमांना अधिकृत स्वरूप दिले. अमेरिकेबाहेर ‘हॅर्लिंगहॅम पोलो असोसिएशन’ ही संघटना या खेळाचे नियंत्रण करते.
प्रत्येकी चार-चार खेळाडूंच्या दोन संघांत आणि २७४·३२ मी. (३०० यार्ड) लांब व १४६·३ मी. (१६० यार्ड) रुंद मैदानात पोलो खेळतात. मैदानाच्या सीमांवर २२·९ सेंमी. (९ इंच) उंचीच्या फळ्या लावतात. भारतात अशा फळ्या सीमारेषांवर लावीत नाहीत, म्हणून भारतातील पोलोच्या मैदानांची रुंदी १८२·८८ मी. (२०० यार्ड) ठेवतात. गोलाचे खांब (गोल-पोस्ट) सु. ३ मी. (१० फूट) उंच आणि ७·३ मी. (८ यार्ड) अंतरावर असतात. हे खांब घोड्याचा धक्का लागला तर घोड्याला इजा होणार नाही पण सहज मोडतील, अशा ठिसूळ लाकडांचे बनवलेले असतात.
प्रत्येकी चार-चार खेळाडूंच्या दोन संघांत आणि २७४·३२ मी. (३०० यार्ड) लांब व १४६·३ मी. (१६० यार्ड) रुंद मैदानात पोलो खेळतात. मैदानाच्या सीमांवर २२·९ सेंमी. (९ इंच) उंचीच्या फळ्या लावतात. भारतात अशा फळ्या सीमारेषांवर लावीत नाहीत, म्हणून भारतातील पोलोच्या मैदानांची रुंदी १८२·८८ मी. (२०० यार्ड) ठेवतात. गोलाचे खांब (गोल-पोस्ट) सु. ३ मी. (१० फूट) उंच आणि ७·३ मी. (८ यार्ड) अंतरावर असतात. हे खांब घोड्याचा धक्का लागला तर घोड्याला इजा होणार नाही पण सहज मोडतील, अशा ठिसूळ लाकडांचे बनवलेले असतात.
चेंडू विलो झाडाच्या मुळांपासून बनवतात. त्याचे वजन १२० ते १३५ ग्रॅ. (४१/४ ते ४३/४ औंस) आणि व्यास ८·२५ सेंमी. (३१/४ इंच) असतो. खेळावयाची काठी वेताची असून तिची लांबी सु. १·२ ते १·४ मी. (४७ ते ५४ इंच) असते. या काठीच्या टोकाला टोले मारावयाची जी आडवी दांडी असते, ती २२·८ सेंमी. (९ इंच) लांब असते व दुसऱ्या टोकाला पकडीसाठी जाळीदार कापडाची फीत गुंडाळलेली असते; तसेच मुठीत अडकविण्यासाठी एक कातही पट्टा असतो.
टीप: खाली फोटोत मुगल कालीन चित्रकाराने साकारलेलं पोलो खेळताना चं चित्र... या चित्राचा कालावधी १६ व्या शतकाचा उत्तरार्ध असावा असं तज्ज्ञांच मत आहे .
धन्यवाद !


0 टिप्पण्या