मुलींना लग्नासाठी कसा मुलगा हवा असतो ?
ह्याचे एकच एक उत्तर असते तर किती बरे झाले असते ! मुलीना कोणाला ठेवू आणि कोणाला नको असे होऊन गेले असते.☺☺☺
मुलींच्या घरातले वातावरण, विशेषतः पुरुषांची वर्तणूक ह्याबाबतीत महत्वाची असते. वडील अगदी 'हिटलर' टाईप असतील तर मुलीना सौम्य बोलणारा तरुण चांगला वाटतो.
दुसरे नैसर्गिकपणे मुलांना वाढवण्याची जबाबदारी स्त्रीवर
असल्याने मुलांच्या सुरक्षे करता त्यांना आर्थिक स्थिती महत्वाची वाटते. खूप मुलांचा याबाबतीत गैरसमज असतो की मुलीला छान छौकीने राहण्यासाठी
पैसे पाहिजे असतात म्हणून. पाहिजे असतात, पण ते बापाचे; नवऱ्याचा
पैसा
शिल्लक
कसा राहील
याची
काळजी लग्नानंतर त्या नवऱ्यापेक्षा
जास्त करतात.( म्हणजे नवरा करतो त्यापेक्षा ) ह्याच कारणाने घर व्यवस्थित असावे, किमान चार खोल्यांचे असा त्यांचा आग्रह असतो. स्त्रीला निसर्गाने लज्जा दिली आहे. त्यामुळे एकांतासाठी खोली असणे ही त्यांची प्राथमिकता असणे स्वाभाविक आहे. पुरुषांनी ही लज्जा राखावी अशी अपेक्षा त्या करतात. त्या अर्थाने त्या अबला असतात. त्यांची भावनिक
गुंतवणूक सासरच्या घरात जास्त असते. तिच्या पगारावर घर बांधले तर काय बिघडले असा विचार पुरुषांनी करू नये. पतीचे कर्तृत्व कुठेतरी दिसले पाहिजे. हीच मुलींची अपेक्षा असते. आर्थिक तडजोड जरूर करावी, परंतु त्याबाबतीत आग्रही असणे बरे नव्हे.
राहिले रूप. ते कोण पाहणार नाही? पण त्यांच्याकडे
तडजोड करण्याची तयारी असते. ह्याबाबतीत आई त्यांची मदत करू शकते.
श्रीमंती/गरिबी हा घटक फारसा महत्वाचा नसतो. तसे असते तर वन-वन (मुद्दाम न नळातला लिहिला आहे ) भटकणाऱ्या अर्जुनाशी द्रोपदीने विवाह केला नसता.
असो. बाकीचे मुद्दे इतरांवर सोडतो.
धन्यवाद !

0 टिप्पण्या