ढगांमुळे वायुसेनेची विमानं रडारमध्ये येणार नाहीत





ढगांमुळे वायुसेनेची विमानं रडारमध्ये येणार नाहीत, असा सल्ला दिल्याचं सांगितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. त्यातच 1987 साली पहिल्यांदा डिजिटल कॅमेराने फोटो काढून ईमेलने पाठवल्याचं मोदी म्हणाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि नेटकऱ्यांच्या कल्पकतेला भरतं आलं.

नरेंद्र मोदी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत दावा केला. '1987-88 च्या सुमारास मी पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा वापरला. त्यावेळी मोजक्या व्यक्तींकडेच ईमेल आयडी होते. गुजरातमधील विरामगाममध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेत मी त्यांचा फोटो काढला. दिल्लीला तो ट्रान्समिट केला. दुसऱ्या दिवशी आपला रंगीत फोटो छापून आल्याचं पाहून अडवाणी अवाक झाले' असं मोदी म्हणाले.
भारतात पहिला डिजिटल कॅमेरा कधी आला? मोदींच्या दाव्यानंतर फॅक्ट चेक

नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया यूझर्सनी तात्काळ या दाव्यातील तथ्य पडताळून पाहण्यास सुरुवात केली. निकॉनने 1987 साली पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा तयार केल्याकडे काही जणांनी लक्ष वेधलं. तर 1995 च्या आधी ईमेल व्यवस्था सामान्य जनतेसाठी उपलब्धच नव्हती, असंही काही जणांनी सोशल मीडियावर मांडलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या