गुगल ड्राईव्ह काय आहे आणि त्याचा वापर कसा करावा .
पूर्वी संगणनकातील एखादी फाईल जर करप्ट झाली तर टी पुन्हा वापरता येत नसे .
नंतर त्याला पर्याय म्हणून फ्लॉपी डिस्क चा शोध लागला आणि पुढे हार्ड डिस्क आणि मेमोरी कार्ड आणि पेनड्राइव्ह चा शोध लागला .
पण ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे हे डिव्हाइस बॅकअप ठेवण्यासाठी वापरले जातात परंतु हे सोबत ठेवावे लागत.
आणि कधी कधी ह्यातील डेटा सुद्धा करप्ट होत असे त्यामुळे तो पुन्हा रिकव्हर करणे ही अशक्यप्राय अशीच गोष्ट असे .
गुगल ड्राइव्ह मुले आपण आपला महत्वाचा डेटा ऑनलाईन सेव्ह करता येतो अथवा बॅकअप घेता येतो .
त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्ही जगाच्या कोणत्याही ठिकाणी जेथे इंटरनेट ची सुविधा आहे तिथे आपले गुगल अकाउंट ओपन करून गुगल ड्राइव्ह वरील डेटा ऍक्सेस करू शकता.
गुगल ड्राईव्ह आपल्याला (गुगल अकाउंटला )१५जीबी फ्री क्लाउड स्पेस उपलब्ध करून देते .
एकावेळी अनेक जण तुमच्या गुगल ड्राईव्ह मधील डेटा एडिट करू शकतात.
तुम्ही तुमच्या लॅपटॉप मोबाईल किँवा पॅड मधून सुद्द्धा गुगल ड्राईव्ह ऍक्सेस करू शकता .
गुगल ड्राईव्ह कशी ओपन कराल ?
तुमच्या ब्राऊजर मधून गुगल अकाउंट वर लॉगिन करा अथवा drive.google.com टाइप करा .
आणि खाली दिलेल्या ग्रीड वर क्लिक करा मग तुमची गुगल ड्राईव्ह ओपन होईल .
आता या ड्राईव्ह मध्ये तुम्ही तुमच्या महत्वाच्या फाइल्स आणि डॉक्युमेन्ट बॅकअप करून ठेऊ शकता .
तुम्हाला एखाद्या मेल मध्ये अटॅचमेंट कोणी पाठविली असेल तर ती सुद्धा तुम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह करू शकता.
तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये वेगवेगेळे फोल्डर्स बनवू शकता जसे तुम्ही तुमच्या मेमोरी कार्ड अथवा हार्डडिस्क मध्ये बनवता .
गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्ही एखादी फाईल किंवा संपूर्ण फोल्डर अपलोड करू शकता .
धन्यवाद !!
आमच्या माय प्रेरणा या संकेतस्थळाला जरूर भेट द्या इथे तुम्हाला विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यकिमत्वांच्या तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा अनुभव घेता येईल


0 टिप्पण्या